Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहा लाखासाठी किनगाव येथील विवाहितेचा मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामनगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना फिरोज तडवी (वय 30) यांचे जळगाव शहरातील रामनगर येथे माहेर आहे. त्‍यांचा विवाह २०२१७ मध्ये फिरोज सरदार तडवी रा. किनगाव ता. यावल यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. विवाहिता किनगाव येथे सासरी नांदत असताना तिचा पती फिरोज तडवी याने मुंबई येथे घर घेण्यासाठी आणि टीईटी परीक्षा पास होण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे अशी मागणी केली. परंतु ही मागणी विवाहितेच्या नातेवाइकांनी पूर्ण न केल्यामुळे पती फिरोज तडवी याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली तर सासू, सासरे, दीर यांनी दमदाटी करून गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता ह्या जळगाव येथील माहेरी निघून आल्या. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती फिरोज सरदार तडवी, सासू मुमताज सरदार तडवी, सासरे सरदार गुलजार तडवी, दीर शाहरुख सरदार तडवी आणि मुक्तार सरदार तडवी सर्व रा. किनगाव ता. यावल यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नितिन पाटील करीत आहे.

Exit mobile version