Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Beating : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेजारी सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या प्रौढ व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून दुखापत केल्याची घटना शिवाजीनगर हुडको येथे घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत गोविंदा सोनवणे (वय-५२) रा. साईबाबा मंदिराजवळ, शिवाजीनगर हुडको जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार २० एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे मनिष बिऱ्हाडे रा. शिवाजी नगर, हुडको आणि योगेश सरदार (पुर्ण नाव माहित नाही) रा. मुंबई यांचे आपसात भांडण सुरू होते. सुरू असलेले भांडण पाहून हेमंत सोनवणे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने योगेश सरदार आणि मनीष बिऱ्हाडे रा. शिवाजीनगर हुडको यांनी हेमंत सोनवणे याला शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने लोखंडी वस्तूने डोक्यात वार करून दुखापत केल्याची घटना घडली. जखमीस तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हेमंत सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रात्री १२ वाजता संशयित आरोपी योगेश सरदार आणि मनीष बिऱ्हाउे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ललित भदाने करत आहे.

Exit mobile version