Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेला मारहाण करत विनयभंग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा हात पकडून मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या गावात राहणारा सुनिल भागवत चौधरी याने रविवारी ३१ मार्च रोजी रात्री १० वाजता महिला ही घरी एकटी असतांना घरात शिरला. त्यानंतर तिचा हात पकडून मारहाण करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुनिल भागवत चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ संदीप पालवे हे करीत आहे.

Exit mobile version