Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेताच्या रस्त्यावरून वृध्दाला बेदम मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । शेताच्या वहिवाटाच्या कारणावरून एका ६५ वर्षीय व्यक्तीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील जुनने शिवारात घडली. याप्रकरणी सात जणांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, रंगराव पुंडलिक आढाव (वय-६५) रा. राणीचे बांबरूळ ता. पाचोरा जि.जळगाव यांचे जुनने ता पाचोरा शिवारात शेत आहे. त्यांच्या शेताच्या बाजूला प्रेमराज भागवत शेवगे रा. बांबरूळ ता. पाचोरा यांचे शेत आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता रंगराव हे शेताचा रस्ता वहीवाटेवरून जात असतांना संशयित आरोपी प्रेमराज शेवगे, भागवत देवचंद शेवगे, मितींद प्रेमराज देवगे, रविंद्र दगा शेवगे, प्रशांत रविंद्र शेवगे, चंद्रकांत रविंद्र शेवगे आणि शशिकांत रविंद्र शेवगे सर्व रा. बांबरूळ ता. पाचोर जि.जळगाव यांनी हातात लाठ्या काठ्या घेवून रंगराव आढाव यांना बेदम मारहाण केली. यात मारहाणीत रंगराव आढाव हे गंभीर जखमी केले व धमकी दिली. याप्रकरणी रंगराव आढाव यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहे. 

Exit mobile version