Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना विवाहितेला लाकडी काठीने मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील एका महिलेला कारण नसतांना चौघांकडून लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे प्रियंका संजय पारधी (वय २७) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १९ नोव्हेंबर रोजी काहीही कारण नसतांना संजय संतोष पारधी, पुष्पा ईश्वर पारधी, सोनी गोपाळ पारधी आणि सागर कडू पारधी सर्व रा. कुऱ्हे पानाचे यांनी लाकडी काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या कानाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच तिला जीवेठार मारण्याची धमकी देखील ही हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  संजय संतोष पारधी, पुष्पा ईश्वर पारधी, सोनी गोपाळ पारधी आणि सागर कडू पारधी सर्व रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ यांच्या विरोधात सोमवारी २० नोव्हेंबर रोजी भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहे.

Exit mobile version