Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पशु पदविकाधारकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । खाजगी व शासकीय पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील सर्व पशु पदविका धारक उपस्थित होते. खाजगी लघु पशु वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांच्या विविध मागण्या गेल्या काही वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे. यावेळी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील यावर कुठलीही उपाययोजना होत नसल्याने 15 जुलैपासून पशु चिकित्सक व्यवसायिक संघटना महाराष्ट्र व खाजगी पशुचिकित्सक संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे राज्यभरात बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. 

या आहेत प्रमुख मागण्या

गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनहि आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा 1984 दुरुस्ती करून महाराष्ट्रातील पदविकाधारकांना न्याय द्यावा, प्रमाणपत्र पदविकाधारकांना स्वतंत्रपणे पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याची अनुमती प्रदान करावी, पशुधन पर्यवेक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी, गाव तेथे प्रथमोपचार केंद्र स्थापन करण्यात यावे अशा विविध मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पशु पदविका धारक संघटनेचे पदाधिकारी निवेदन दिले.

या धरणे आंदोलनाला खाजगी पशु वैद्यकीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दीपक लोखंडे, शासकीय पशु वैद्यकिय संघटना अध्यक्ष डॉ. हेमंरात पाटील, डॉ. सुधाकर शेळके, डॉ. गोपाल सोनवणे, डॉ. राजेद्र डाबरे, डॉ. गणेश पाटील, डॉ. सोपान दुपटे, डॉ. विकास नवले, डॉ.योगेश राजपुत, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. पंकज सुर्यवंशी सह जिल्ह्यातील पशु पदविकाधारकांचे पदाधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.

 

Exit mobile version