जरा धीर धरा, राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो ! : मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी | लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथील करण्याची मागणी करणार्‍या भाजप व मनसेला आज मुख्यमंत्र्यांनी फटकारत जरा धीर धरण्याचा सल्ला दिला.

कोविडच्य संभाव्य तिसर्‍या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या माझा डॉक्टर या ऑनलाईन परिषदेचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह भाजपलाही फटकारले. ता म्हणाले की, अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको.

राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

आता सणवाराचे दिवस सुरु. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Protected Content