Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वतःच्या क्षमतांची जाणीव करा म्हणजे यश नक्कीच मिळते – संजय गरूड

शेंदुर्णी, ता जामनेर (प्रतिनिधी)। स्वतःच्या क्षमतांची ओळख करा म्हणजे यश नक्की मिळते] असे मनोगत संस्थेचे चेअरमन माजी जि.प. सदस्य संजय गरुड यांनी विद्यालयामध्ये आयोजित गुणवंतांचा विद्यार्थी पालक सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

नुकत्याच लागलेल्या दहावी बोर्डाचा निकाल लागला असुन येथिल आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये सेमि इंग्रजी मधुन राणी संजीव भावसार हिने ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तसेच, विद्यालया मधुन ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहे. यामध्ये द्वितीय बारी पायल गणेश ९५.४०, तृतीय शुभम अशोक वानखेडे ९५ टक्के, चतुर्थ तनुजा तुकाराम तायडे ९४.८०, दिप निलेश जैन ९४ .४०, कु.वैष्णवी अनिल देसाई ९४.२०, महेश संजय चौधरी ९३.८० टक्के, जैन भाविक शैलेश ९३.८०, साईराज शांताराम गुजर ९३.६०, गरूड वैभव देविदास ९३.४०, चैतन्य भास्कर गरुड ९३.४० टक्के गुण मिळवून पहिल्या दहा मध्ये येण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.

गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय गरूड होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सचिव सागरमल जैन, शांताराम गुजर, दक्षिण भाग विकास सोसा. चेअरमन सुनिल गरूड, मुख्याधापक डि आर शिंपी सर, उपमुख्याध्यापक आर.एस.चौधरी, पर्यवेक्षक ए.बी. ठोके, आणि आर.एस. चौधरी, विद्यार्थी पालक उपस्थीत होते. उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पीजे पाटील, आभार उपमुख्याध्यापक आर एस चौधरी सरांनी मानले. यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि पालंकांमधून वैष्णवी देसाई, राणी भावसार, पालकांमधुन संजय चौधरी, शांताराम गुजर, सागर मल जैन यांनी मनोगत व्यक्त केले.

Exit mobile version