Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत बार, पब आणि क्लबला ९ सप्टेंबरपासून परवानगी

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । जवळपास सहा महिन्यानंतर अनलॉकच्या चार टप्प्यानंतर हळूहळून जनजीवन सामान्य स्थितीत परतण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. सरकारकडून हळूहळू अनेक निर्बंध हटवण्यात येत आहेत. याच क्रमात दिल्लीत बार, पब आणि क्लबला ९ सप्टेंबरपासून मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात आलीय. क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच इथं बसण्याची परवानगी असेल . दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजन यांनी दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय.

मदयविक्रीला परवानगी मिळाली असली तरी करोनाचे नियम आणि गाईडलाईन्स पालन मद्यप्रेमींनाही आणि बारलाही करावं लागणार आहे. सरकारकडून यासाठी एक मानक प्रक्रिया जारी करण्यात आलीय.

९ सप्टेंबरपासून हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि क्लब उघडले जातील. परंतु, ३० सप्टेंबर हे केवळ ट्रायल बेसिसवर उघडले जाणार आहेत. ज्या व्यक्तींना करोनाची कोणतीही लक्षणं नसतील अशाच व्यक्तींना बार आणि पबच्या स्टाफमध्ये काम करण्याची परवानगी असेल थर्मल स्क्रिनिंगनंतरच ग्राहकांना बार किंवा पबमध्ये प्रवेश दिला जाईल कंटेन्मेंट झोनमध्ये येणाऱ्या बार, पब आणि क्लब उघडण्यावर बंदी कायम आहे प्रवेशद्वारावर आणि इतर ठिकाणी सॅनिटायझर स्टँड लावले जातील बार आणि पबमध्ये काम करणाऱ्या स्टाफनं ग्लोव्हज, फेस मास्क परिधान करतानाच वारंवार आपले हात साफ करण्याची काळजी घ्यायची आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरन्टसाटी ४ जून रोजी केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सचही पालन करावं लागणार आहे नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळल्यास ‘डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट’ आणि भारतीय कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल. संबंधित जागेची परवानगी काढून त्याला सील केलं जाईल. एक्साईज लायसन्सही रद्द होण्याची शक्यता आहे

Exit mobile version