Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेत रस्त्यावरून बापलेकाला मारहाण; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी । शेतातील रस्त्याच्या कारणावरून मुलासह वडीलांना बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील तामसवाडी येथे घडली. याप्रकरणी सात जणांविरोधात पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील नवल माणिक पाटील (वय-२८) हा तरूणी १ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९ वाजता तामसवाडी शिवारातील त्याच्या शेतात जात असतांना त्यांच्या शेताच्या शेजारी राहणारे प्रविण बापू पाटील यांनी शेतातील वाहिवाट रस्त्याच्या कारणावरून नवल पाटील याला मारहाण केली. यावेळी प्रविण पाटील याच्यासह खंडू भावराव पाटील, पांडूरंग हिरामण पाटील, अनिल मोतीलाल पाटील, वसंत भोजू पाटील, उषाबाई प्रदीप पाटील रा. तासवाडी ता. पारोळा आणि रविंद्र प्रदीप पाटील रा. शेरूळ ता. मालेगाव जि. नाशिक यांनी मिळून शेतात नवल पाटील आणि त्यांचे वडील माणिक पाटील यांनी शिवीगाळ करून लाठ्या काठ्या आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केले होते. यासंदर्भात नवल पाटील यांनी पारोळा न्यायालयात तक्रार दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपींविरोधात पारोळापोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करीत आहे.

 

Exit mobile version