Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्हॉटसॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून बापलेकाला मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथे व्हॉटसॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावरून एका शेतकऱ्याला व त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जगन खेमराज जाधव वय ४१ रा. रामेश्वर खुर्द ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणाऱ्या काहींनी व्हॉटसॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या जगन जाधव यांच्यासोबत हेमंत प्रकाश पवार, नाना दयाराम पवार, श्याम दयाराम पवार आणि राहूल प्रकाश पवार सर्व रा. रामेश्वर खुर्द ता. अमळनेर यांनी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर जगन जाधव यांच्यासह त्यांचा मुलगा नितीन जाधव याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या दोघांना अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार घेतल्यानंतर मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून चौघांविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे हेमंत प्रकाश पवार, नाना दयाराम पवार, श्याम दयाराम पवार आणि राहूल प्रकाश पवार सर्व रा. रामेश्वर खुर्द ता. अमळनेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.

Exit mobile version