Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मानपुरी येथील बापलेकाला जुन्या वादातून मारहाण; यावल पोलीसात तक्रार दाखल

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मानपुरी येथील बापलेकाला कौटुंबिक वादातून नातेवाईकाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना उघडकीला आली आहे. दोन्ही जखमींना उपचारार्थ जळगावात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी यावल पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

धुबडा मकड्या बारेला (वय-५० )आणि त्यांचा मुलगा राजाराम धुबडा बारेला (वय-५०) असे जखमी झालेल्या बापलेकाचे नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील मानपुरी येथील रहिवासी धुबडा मकड्या बारेला यांचे जवाई लक्ष्मण किमान बारेला रा. मानपुरी यांच्या जुन्या वादावरून मंगळवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता बाचाबाची झाली. त्यामुळे जवाई लक्ष्मण बारेला याने सासरे धुबळा मकड्या बारेला वय 45 आणि शालक राजाराम दुबळा बारेला वय 27 यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.  यात राजाराम बारेला हा गंभीर जखमी झाला असून त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठीजळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी राजाराम बारेला यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version