Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला

MIDC News

जळगाव प्रतिनिधी । वीस दिवसांपुर्वी घरातून बेपत्ता झालेला तरूणाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याप्रकार तालुक्यातील विटनेर शिवारातील जंगलात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील विटनेर शिवारात आलेल्या भवानी मंदीराच्या परीसरातील जंगलात शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास एका झाडाला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या आवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी विटनेर येथील पोलीस पाटील साहेबराव धुमाळ यांनी एमआयडीसी पोलीसांना माहिती कळविली. एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, शिवदास चौधरी, शशिकांत पाटील, समाधान पाटील, भूषण सोनार यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. यावेळी मृतदेह एवढा कुजलेला होता की ओळखने अवघड झाले होते.

मयताची ओळख पटली; हरविल्याची हनोंद
बद्री जनकु बारेला वय-25 रा. बायखेडा, पो. झिरनया जि. खरगोन (म.प्र.) असे मयताचे नाव आहे. बद्री हा 8 सप्टेंबर रोजी सकाी 7.30 वाजता बाहेर जावून येतो असे पत्नी ममता यांना सांगून गेला होता. रात्री उशीरापर्यंत पती घरी आले नसल्याने त्यांनी नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केला. बद्री घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी देखील शोध घेतला. अखेर 9 सप्टेंबर रोजी रात्री उशीरा पती बद्री बारेला हरविल्याची नोंद एमआयडीसी ठाण्यात करण्यात आली होती.

 

Exit mobile version