Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बापरे !, तरूणीला गुंगीचे औषध देवून जळगावातून हैद्राबादला नेले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरूणीला शितपेय मध्ये गुंगीचे  औषध देवून तिचे अपहरण करत हैद्राबाद येथे नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १३ सप्टेंब रोजी सायंकाळी संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह रा. नंदा नगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, (तेलंगाणा) याने तरूणीला तिच्या राहत्या घरात शितपेयमध्ये गुंगीचे औषध देवून तिला बेशुध्द केले. त्यानंतर तिला कारमध्ये बसवून थेट हैद्राबाद येथे तिचे लग्न लावण्यासाठी घेवून गेला. त्याठिकाणी तरूणीला दोन दिवस तिच्या इच्छेविरूध्द घरात डांबून ठेवले यात दरम्यान तरूणीला मारहाण सुध्दा केली. तसेच तरूणीच्या होणाऱ्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना मोबाईलद्वारे बदनामी केली. कशीबशी संशयित आरोपीच्या तावडीतून सुटून तरूणीने जळगाव गाठले. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दिली. तरूणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह रा. नंदा नगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, (तेलंगाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

Exit mobile version