Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा १०० टक्के निकाल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंच्या जन्मगावी वाकोद ला असलेल्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या इयत्ता १२ वीच्या पहिल्या बॅचचा शंभर टक्के निकाल लागला. सौरभ प्रकाश देठे ७३ टक्के गुणांसह कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर राधिका दीपक काटे ७१.८३ टक्क्यांसह द्वितीय क्रमांक, गायत्री जगदीश भगत ६८ टक्क्यांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर न जाता, गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजची स्थापना करण्यात आली. या कॉलेजमधील इयत्ता १२ वी ची यंदा पहिलीच बॅच होती. विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, प्राचार्या रुपाली वाघ यांच्यासह शिक्षकांनी केले आहे. बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज, वाकोदला विज्ञान शाखेसाठी इयत्ता ११ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी कॉलेजला संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य रुपाली वाघ यांनी केले आहे.

कोट…
‘शिक्षण हे भवितव्याची आणि भविष्याची गुंतवणूक असते.’ या मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच वाकोदला बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सेवेत आहे. विज्ञान शाखेमध्ये करिअर करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी हे कॉलेज सर्वांगीणदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरु शकेल. यंदा पहिल्याच बॅचचे सर्वच्यासर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने त्याचे विशेष कौतूक आहे. ’
-अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

Exit mobile version