Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतविरुध्द बांगलादेश: पहिल्या कसोटी सामन्यावर भारताचे वर्चस्व

India vs west indies cricket

इंदूर वृत्तसंस्था । भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे पहिल्या सत्रावर भारताचे पारडे जड मानले जात आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 9 कसोटी सामने झाले आहेत त्यापैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवाल असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत विजय मिळवून सलग 12वी कसोटी मालिका जिंकण्याचा कोहली आणि संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार म्हणून 5 हजार धावा करण्यासाठी 32 धावांची गरज आहे. तर कर्णधार म्हणून सर्वधिक शतक स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्याला आणखी एका शतकाची गरज आहे. सध्या हा विक्रम कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या दोघांच्या नावावर आहे. या दोघांनी कर्णधारपदावर असताना प्रत्येकी 19 शतके केली आहेत.

संघ-
भारत (अंतिम १२) : रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, कुलदीप यादव.

बांगलादेश : मोमिनूल हक (कर्णधार), इम्रूल कायेस, मुशफिकूर रहिम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला रियाद, मोहम्मद मिथुन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, मुस्ताफिझूर रेहमान, नईम, हसन, सैफ हसन, शदमान इस्लाम, तैजूल इस्लाम, अबू जायेद, ईबादूत हुसैन, अल अमिन हुसैन.

Exit mobile version