मतपत्रिका दाखविण्याऐवजी एजंटच्या हातात दिली – भाजपचा आक्षेप

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या ६ जागांच्या निवडणुकीसाठी मतदान होत असून द्पारी दोन वाजेपर्यत सुमारे २५० आमदारांनी मतदान केले. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली जाणार असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान होत असून यात महाविकास आघाडी आणि भाजपला एक एक मताचे महत्व आहे. त्यामुळे एकही मत वाया जाऊ नये, यासाठी काळजी आमदारांनी घेत मतदान केले. परंतु राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना तुरुंगात असल्यामुळे मतदान करता येणार नाही.

तर दुसरीकडे मतदान करताना प्रत्येक पक्षाचा मतदार निवडणूक प्रतिनिधीला फक्त मतपत्रिका दाखवायची असते, परंतु  जितेंद्र आव्हाड यांचेसह अन्य दोन जणांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली असल्याचा आरोप भाजपचे आ. आशिष शेलार आणि पराग आळवणी यांनी केला. यात नियमांचा भंग झाला असून आक्षेप घेत तीन  मते बाद करावीत अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.

मतदानाचे व्हिडीओ शुटींग असून नियमांचा भंग झालेला असल्याचे भाजपा आमदारांनी म्हटले आहे. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी तो आक्षेप फेटाळून लावला असून भाजपला पराभव दिसत आहे. त्यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केले आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

Protected Content