Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनतर्फे पर्यायी स्मशानभूमीची मागणी

 

पाचोरा प्रतिनिधी । शहरात हिंदू समाजासाठी तात्काळ पर्यायी स्मशानभूमीची व्यवस्था व्हावी, अशा मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनतर्फे नुकतीच आ.किशोर पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील श्रीराम नगर, जामनेर रोड, शिंधी कॉलनी, गजानन नगर, श्रीकृष्ण नगर, गजानन नगर मोढाळा रोड, सावा प्लाट ,कृष्णापुरी भैरवनगर, त्र्यंबक नगर गुरुदत्त नगर, गोविंद नगर सारोळा रोड परिसर, शिव कॉलनी भागातील एखाद्या नागरिकाचे दुःखद निधन झाल्यास पावसाळ्याच्या दिवसात त्याच्या अंत्यविधीसाठी हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यासासाठी दुस-या कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या विचार करून आम्हा सर्व रहिवाशांना एका हिंदू स्मशानभूमीची व्यवस्था आ. पाटिल यांनी करून द्यावी, तसेच नगरपालिकेच्या मालकीच्या कोणत्याही जागेमध्ये कुठेतरी पर्यायी हिंदू स्मशानभूमी व्यवस्था कायमसाठी करून द्यावी, अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे.

Exit mobile version