Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसे महाविद्यालयात गोळा फेक स्पर्धा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात गोळा फेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थी खेळाडूंमध्ये असलेल्या सूक्त गुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने क्रीडा विभागामार्फत क्रीडसंचालक डॉ. प्रतिभा ढाके यांनी  स्पर्धांचे आयोजन केले होते. यात १४ मुले व १४ मुली यांनी आपला सहभाग नोंदवला.   या स्पर्धेत अजय तायडे प्रथम क्रमांक, नंदन महाजन द्वितीय क्रमांक ,कुणाल तायडे तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले. तर मुलींमध्ये कु.मनीषा गरुडे प्रथम ,निकिता बोदडे द्वितीय, कोमल दांडगे तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले.

या स्पर्धेत अजय तायडे, सिद्धेश्वर पालवे, नंदन महाजन विजय कवळे , कृष्णकांत भारुडकर, कुणाल तायडे ,निखिल शेळके, कमलेश धुंदले ,शेखर वानखेडे ,अमोल गुंजाळ या मुलांनी; तर मुलींमध्ये काजल पाटील, भाग्यश्री सोनी ,निकिता कोळी, साक्षी मोरे ,कोमल दांडगे, मनीषा गरुडे ,निकिता बोदडे ,दिव्या सपकाळे, दिपाली पाटील, निशा चौधरी या मुलींनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केल .

स्पर्धेच्या आयोजनात प्रणव पवार,चंदन शिमरे,आनंद मराठे  व   यांनी अनमोल सहकार्य केले. यशस्वी खेळांडूचे प्राचार्य डॉ.एच .ए.महाजन.उपप्राचार्य डॉ. ए.पी.पाटील व  उपप्राचार्य डॉ. आर.टी. चौधरी यांनी कौतुक केले.

Exit mobile version