बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटवला – विविध स्तरावर उमटताय प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग वृत्तसंस्था | सिंधुदुर्ग येथील जिल्हा बँकेच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी ठाकरे आणि राणे यांच्यातील वाद मात्र अद्यापही थांबायचं नाव घेत असून राणे गटाने यात विजय संपादन केल्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बँकेतून हटवण्यात आला आहे. यावर विविध स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

सिंधुदुर्ग येथील जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राणे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगला होता. राणे गटाने यात विजय संपादन केल्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातील बाळासाहेब ठाकरे यांच्यासह सोनिया गांधी आणि शरद पवार यांचेही फोटो बँकेतून हटवण्यात आले असून त्याजागी केवळ नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबत नेहमीच आदर दाखवलाय मात्र सिंधुदुर्ग बँके निवडणुकीत ११ विरूद्ध ८ अशा फरकाने भाजपने सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला. विजय संपादन केल्यानंतर अध्यक्षांच्या दालनातील उद्धव ठाकरेंबरोबर बाळासाहेबांचा फोटो हटवण्यात आला आहे. या घडामोडींची चर्चा रंगत असून विविध प्रतिक्रिया येत आहेत

शिवसेनेच्या वतीने प्रतिक्रिया देतांना खासदार राऊत यांनी म्हटलंय की, “बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेनं नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय मोठे झाले. त्या बाळासाहेबांची प्रतिमा हटवत असताना त्यांच्यातील माणुसकी हरवली आहे” अशी टीका केली आहे. निवडणुका पार पडल्या असल्या तरी अद्यापही ठाकरे आणि राणे यांच्यातील वाद मात्र थांबायचं नाव घेत नाहीय.

Protected Content