Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाळासाहेब ठाकरे यांना भारतत्न द्यावे : तोगडियांची मागणी

नागपूर प्रतिनिधी | राम मंदिर आंदोलनात महत्वाचा सहभाग असणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना केंद्र सरकारने भारतरत्नने सन्मानित करावे अशी मागणी केली आहे.

नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलतांना विश्‍व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडीया म्हणाले की, राम मंदिर आंदोलनाचा भाग असणार्‍या आणि बाबरी मशीद पाडण्याच्या मोहिमेचं नेतृत्व करणार्‍या चार नेत्यांना केंद्रामध्ये राम मंदिराच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा. या चार जणांमध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचाही समावेश असून त्यांच्यासहीत अशोक सिंघल, गोरख पीठाधीश्वर अवेद्यनाथजी, रामचंद्र परमहंस यांनाही भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी तोगडीया यांनी केलीय.

या चौघांसोबत माझं खास नातं आहे. या चौघांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत मी म्हणेल की भारत सरकारने राम मंदिर आंदोलनाचा सन्मान केलेला नाही. या चौघांनाही भारतरत्न जाहीर करा आणि ज्या राम मंदिराच्या नावावर सत्ते आला आहात त्याची ऋणमुक्ती सत्तेत असलेल्यांनी प्राप्त करावी, असं तोगडीयांना म्हटलं आहे.

तोगडीया यांनी राम मंदिर आंदोलनासंदर्भात बोलताना बाबरी पाडल्याचा गर्व आहे असंही म्हटलंय. आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून हिंदू लढत होते. शौर्य दाखवत होते. संघर्ष करत होते. त्यापैकी ६ डिसेंबरचं शौर्य हे तीन मुद्द्यांसाठी अद्वितीय आहे. आम्हाला गर्व बाबरी पाडण्यावर. जिथे एकेकाळी मशीद होती तिथे मंदिर उभारलं याचा आम्हाला गर्व आहे.   माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी करियर, पैसे बनवण्यासाठी जाण्याऐवजी रामाच्या जन्मभूमीमध्ये मंदिर बनवण्यासाठी पुढे आले याचा मला गर्व आहे, असं तोगडीया म्हणालेत.

 

Exit mobile version