शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे बोंबाबोंब व भाजी फेक आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, सचिन गोसावी । शेतकर्‍यांना योग्य भावात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावेत, तातडीने पीक कर्ज वाटप करावे, बोगस बियाणे विकणार्‍यांवर कारवाई करावी आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आज बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब व भाजी फेक आंदोलन करण्यात आले

मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीचा कहर व त्यामुळे घोषित केलेले अनाकलनीय लॉकडाऊन आणि हुकुमशाही सदृश्य लॉकडाऊनचे निर्बंध यामुळे महाराष्ट्रासह  देशातील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.  त्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या उदासीन आणि ढिसाळ ध्येय धोरणामुळे अगोदरच कर्जबाजारी व समस्याग्रस्त असेलल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.  खते, बी-बियाणे जुन्या दरापेक्षाही ५० टक्के पेक्षा कमी दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडीत आवश्यक वस्तूची दुकानांचे योग्य ते व्यवस्थापन करून दिवसभर सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी. तातडीने नवीन पिक कर्ज वाटप करण्याचे संबधित बँकांना आदेश द्यावेत. बोगस बी-बियाणे व भेसळयुक्त रासायनिक खते विक्री किंवा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने खते, बी-बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तत्काळ कार्यवाहीचे आदेश देवून त्यांचे परवाने रद्द  करण्यात यावेत. केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यात यावेत आदी मागण्यासाठी बोंबाबोंब आंदोक्न करण्यात आले. त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला, फळ भाज्या व फळे यांची विक्री करण्यात आली.  हे अनोखे बोंबाबोंब आंदोलन  बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष  अमजद रंगरेज  यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, महानगर उपाध्यक्ष रियाज पटेल, रहीमभाई तांबोली, सुकलाल पेंढारकर, देवानंद निकम, खुशाल सोनवणे आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/505575190683136

Protected Content