बहिणाबाई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

nmu new

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व शारिरीक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या 9 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे.

आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील बी.एड., एम.एड., बी.पी.एड., एम.पी.एड., स्पेशल बी.एड.-एम.आर., स्पेशल बी.एड.-व्ही.आय. आणि बी.पी.ई. या सात अभ्यासक्रमाच्या परीक्षा 9 डिसेंबर पासून सुरु होणार असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. तथापि संलग्नित महाविद्यालयातील विद्याथ्र्यांनी केलेल्या मागणीनुसार व विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार 9 डिसेंबर रोजी होणारी बी.एड., एम.एड., बी.पी.एड., एम.पी.एड., स्पेशल बी.एड.-एम.आर., स्पेशल बी.एड.-व्ही.आय. या सहा अभ्यासक्रमांची परीक्षा 9 डिसेंबर ऐवजी आता 31 डिसेंबर रोजी आणि बी.पी.ई. अभ्यासक्रमाची परीक्षा 9 डिसेंबर ऐवजी 18 डिसेंबर रोजी त्याच निर्धारित परीक्षा केंद्रावर व त्याच निर्धारित वेळेवर आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली.

Protected Content