Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव येथे उद्यापासून बहिणाबाई महोत्सव

जळगाव प्रतिनिधी | भरारी फाउंडेशनतर्फे बहिणाबाई महोत्सवाचे अायाेजन १७ ते २१ जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर करण्यात अाले आहे.

१७ राेजी सायंकाळी ५.३० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सागर पार्क मैदानावर उद्घाटन होईल. खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, उद्योगपती अशोक जैन, रजनीकांत कोठारी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी डॉ. पी. सी शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. फाउंडेशनतर्फे महोत्सव आयोजनाचे यंदा सहावे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे बहिणाबाईंचे गाव व बहिणाबाईंच्या चष्म्याचे भव्य प्रवेशद्वार याठिकाणी साकारण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दीपक परदेशी यांनी दिली.

१७ जानेवारीला महिलांसाठी कुकरी शो, रांगोळी स्पर्धा, चित्रकला आदी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर शाहीर अजिंक्य लिंगायत आणि सहकारी यांचा alt147लोकरंग महाराष्ट्राचा’, १८ जानेवारीला मराठी संस्कृतीचा फॅशन शो, १९ जानेवारीला भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांचे भारुड, असे सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

राजेश पाटील आयएएस (ओरिसा), संदीप कुमार साळुंखे अप्पर आयकर आयुक्त (पुणे), भारुडकार चंदाताई तिवाडी (पंढरपूर), नरसिंह परदेशी (जळगाव), दीक्षा दिंडे (पुणे), साक्षी गायधनी उत्कृष्ट खेळाडू (अकोला), वंदना बागुल (चाळीसगाव), शैला चौधरी (जळगाव), मीना बनवट (जळगाव), सुकन्या पाटील आयआयटी सुवर्ण पदक विजेती (जळगाव), आनंद लोकनाट्य मंडळ(जळगाव) यांना पुरस्कार देऊन गाैरवण्यात येणार अाहे.

Exit mobile version