Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील प्राध्यापक संमंत्रकांसाठी प्रशिक्षण

NMU 1

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने विविध विद्याशाखेतील प्राध्यापक संमंत्रकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०१९ मध्ये जळगाव, धुळे व नंदूरबार तसेच महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील इतर जिल्ह्यांतून पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षणक्रमांतर्गत प्रवेश देण्यापासून ते अंतिम निकालापर्यंतच्या विविध प्रक्रियांची माहिती करुन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विभागाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी, प्रा.एस.टी.बेंद्रे, प्रिन्सिपल इन्वेस्टिगेटर सिलेज (सीएडीपी) हे उपस्थित होते. प्रा. चौधरी यांनी विभागाच्या कार्यपध्दतीची माहिती देतांना विद्यार्थी संख्या वाढीच्या दृष्टीने तसेच गुणवत्तापूर्वक शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी विभागाद्वारे राबविण्यात येणारे नवनवीन उपक्रम व केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत माहिती देऊन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. डॉ.बेंद्रे यांनी बहि:स्थ शिक्षणाच्या माध्यमातून विविध संधी व उच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग कसे आत्मसात करता येईल व संमंत्रण करतांना तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमास ५५ प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन व आभार सह.प्रा.मनिषा जगताप यांनी केले.

Exit mobile version