Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनुदानाची व्यवस्था करा, नाही तर … बच्चू कडूंचा इशारा !

मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभेच्या आगामी निवडणुकीआधी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला हरभरा आणि धान या पीकांच्या अनुदानाबाबत इशारा दिला आहे.

राज्यसभेच्या निवडणुका जवळ आल्या असतांना मविआ आणि भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. याचदरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सूचक इशारा दिला आहे. केंद्राने हरभर्‍याची खरेदी सुरू करावी त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी अन्यथा राज्यसभेसाठी मतदान करणार नाही, आघाडीलासुद्धा शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू असा इशार बच्चू कडू यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख आहे आणि धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. आणि आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी हात वर करत आहे. असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत.

याबाबत ना. बच्चू कडू म्हणाले की, उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. आणि केंद्र सरकारने खरेदी नाही केली तर एका हेक्टरला जार हजार रूपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे नाहीतर राज्यसभेची निवडणूक आम्ही शेवटच्या पाच मिनिटांत मारणार आहोत. असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

Exit mobile version