Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फरार आरोपी बाबा काल्या अटकेत

baba kalya aaropi भुसावळ प्रतिनिधी । कोर्टाच्या आवारातून पलायन केलेला कुख्यात गुंड बाबा याला आज पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहर पो स्टे भाग ५ गुरनं१८०/२०१९ या गुन्ह्यामधील फरार आरोपी आशिक बेग अस्लम बेग उर्फ बाबा काल्या हा दि ०२/०८/२०१९ रोजी कोर्टातून लघु शंकेचे बहाणा करून संडाशीच्या खिडकीच्या ग्रील वाकवून काच फोडून फरार झालेला होता. या आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना गुप्त बातमी मिळाल्याने त्यांनी राजेंद्र साळुंके, मनोहर शिंदे, सुनील थोरात, सुनील सैदाणे, निलेश बाविस्कर, अमोल विसपुते, विकास पाटील, विकास सातदिवे व प्रवीण जाधव यांच्या पथकाची निर्मिती केली. या पथकाने बाबा काल्यास यास चाळीसगाव रेलवे स्टेशन येथून अटक केली असून त्यांना शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

Exit mobile version