Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लहान मुलाच्या भांडणावरून बाप-लेकाला दांडक्यासह कुऱ्हाडीने मारहाण; वराड बुद्रुक येथील घटना

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील वराड बुद्रुक येथे लहान मुलांच्या भांडणावरून बाप-लेकाला लाकडी दांडक्यासह कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रविवार २० मार्च रोजी एमआयडीसी पोलिसांत चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथे राजेंद्र कैलास जाधव  (वय-३२) हे कुटुंबासह वास्तव्यास आहे. शनिवार १९ मार्च रोजी लहान मुलांच्या भांडणावरून गावातील लक्ष्मण सपकाळे यांचे वडील व भाऊ राजेंद्र जाधव यांना शिवीगाळ करत होते. याचा जाब विचारण्यासाठी जाधव हे सपकाळे या कुटुंबांकडे गेले असता लक्ष्मण सपकाळे याने लाकडी दांडक्याने राजेंद्र जाधव यांच्या डोक्यावर व हातावर मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी राजेंद्र जाधव यांचे वडील कैलास विठ्ठल जाधव आले असता त्यांच्यावर राम हिरामण सपकाळे याने कुऱ्हाडीने वार केले. इतर दोघांनीही राजेंद्र जाधव व त्यांच्या वडिलांना लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र जाधव व त्यांचे वडील दोघेही जखमी झाले आहेत. अशा राजेंद्र कैलास जाधव यांच्या तक्रारीवरून लक्ष्मण हिरामन सपकाळे, राम हिरामण सपकाळे, रवींद्र हिरामण सपकाळे, हिरामण सोनजी सपकाळे सर्व रा. वराड बुद्रुक या ४ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहेत.

Exit mobile version