Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आझम खान…म्हणे ; डोकं करेना काम..!

azam khan

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील निकाल अनपेक्षित असून आमची चूक कुठे झाली, काय झाले, आपली अक्कलच काम करत नाहीए, असे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी निवडणूक निकालाचे विश्लेषण करताना म्हटले आहे. दरम्यान, सन २०२२ च्या विधानभा निवडणुकीतही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती कायम राहील आणि पक्ष पुनरागमन करेल असा विश्वास खान यांनी व्यक्त केला आहे.

 

उत्तर प्रदेशात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जे घडले, तसे या पूर्वी कधीही घडलेले नाही. यंदा उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाची लाटही नव्हती. असे असताना भाजपला यश कसे मिळाले हे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत, असे आझम खान यांनी म्हटले आहे.

बहुजन समाज पक्षाची मते समाजवादी पक्षाला मिळाली नाहीत का, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, जोपर्यंत दोन्ही पक्ष एकत्रितपणे विश्लेषण करत नाहीत, तोपर्यंत याबाबत ठामपणे काही सांगता येत नाही. हे काही जातीय समीकरणाचे राजकारण नव्हते, तर ते मतांचे समीकरण होते. अनेक मतदारसंघांमध्ये आम्ही फक्त १५ ते २० हजार मतांनीच हरलो आहोत. आम्ही या पूर्वी सतत जिंकत आलेल्या जागाही गमावल्या आहेत. काहीही झाले तरी, आमती युती २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही असेल, असेही खान यांनी स्पष्ट केले. ही युती तोडावी असे कोणतेही कारण नसल्याचेही ते म्हणाले. अखिलेश यादव आणि मायावती यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. तसेच दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबतही कोणताही वाद नसल्याचेही ते म्हणाले.

Exit mobile version