Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योगेश पाटील यांना डॉक्टरेट प्रदान

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील योगेश पाटील यांना पत्रकारिता सोशल एज्युकेशनमध्ये मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मॅजिक आर्ट युनिव्हर्सिटी तर्फे सन – २०२२ मधील डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले.

एनसीआर (दिल्ली) येथे पार पडलेल्या एका समारंभात न्यूज झेप इंडिया तथा सहयाद्री भूषण चे संपादक योगेश रमेश पाटील यांना डॉक्टरेट बहुमान देऊन ट्रॉफी सर्टिफिकेट अशोकस्तंभ मुद्रिका व अँटी रेडिएशन देऊन गौरविण्यात आले. योगेश पाटील हे आर्वे – मोंढाळा वि. वि. का. स. सोसायटीचे माजी चेअमन तथा संचालक रमेश पाटील यांचे पुत्र आहेत. यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासनातर्फे विशेष कार्यकारी अधिकारी, भ्रष्टाचार निर्मूलन संस्था विविध संघटना, पत्रकारीतेत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच शैक्षणिक क्षेत्रात आदर्श शिक्षक, विविध संघटना पदाधिकारी म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रा बरोबरच कुणबी पाटील फाऊंडेशन तर्फे समाज कार्यासाठी समाज रत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. तसेच वांगी येथील सामाजिक संस्थेतर्फे जगतगुरु संत तुकाराम महाराज समाज भूषण तथा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारीतेत आपले तत्व न सोडता पत्रकारिता क्षेत्रात एक चांगला आयाम त्यांनी केला आहे.

शैक्षणीक सामाजिक कार्यात आवड असल्याने शैक्षणिक क्षेत्रात शुन्य मुल्य खर्च न करता शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल व मुलांचे भविष्य कसे घडेल यात दिलेल्या आयडिया मुळे ही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या डॉक्टरेट मुळे ते आता डॉक्टर पाटील म्हणूनही त्यांना आपली ओळख निर्माण होणार आहे. त्यांना मिळालेल्या डॉक्टरेट मुळे मित्र परिवार यांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केलें आहेत.

कार्यक्रम प्रसंगी – केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हरियाणा मुलचंद शर्मा, यशपाल यादव (कमिशनर फरिदाबाद), बदकाल विधानसभा आमदार नारायण पाल रावत, विशेष अतिथी विजेंद्र बंसल (आमदार रिथला विधानसभा), विजेंद्र बंसल (दैनिक जागरण), रामावतर शर्मा सुप्रीम कोर्ट, विशेष अतिथी आर. आय. बारेर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाकूर शैलेंद्रसिंग नंमबेरडदार, डॉ. सी. पी. यादव तसेच विविध २२ राज्यातून आलेले पुरस्कार सन्मानार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Exit mobile version