Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजवड येथील निळकंठ पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेती तसेच शेतीपुरक व्यवसायात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राजवड आदर्शगांव येथील शेतकरी निळकंठ दगडू पाटील व पुष्पलता निळकंठ पाटील यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. 

जिल्हा परिषद, जळगाव जि.प.सेस योजना 2021-22 अंतर्गत कृषी विभाग जिल्हा परिषद, जळगावतर्फे शेती तसेच शेतीपुरक व्यवसायात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राजवड आदर्शगांव येथील शेतकरी निळकंठ दगडू पाटील व पुष्पलता निळकंठ पाटील यांना गौरवचिन्ह, अभिनंदन पत्र व दहा हजारांचा धनादेश बक्षीस या स्वरूपाचा ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ पारोळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय लोंढे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

त्यांना या मिळालेल्या शासकीय आदर्श शेतकरी पुरस्काराबद्दल आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,सौ पुष्पलता पाटील,यांनी अभिनंदन केले. यावेळी पारोळा तालुका कृषी अधिकारी श्री.वाघ, श्री ठाकूर, माजी जि.प. कृषी सभापती डाँ. दिनकर पाटील, शेतकी संघाचे संचालक सुधाकर पाटील, गणपत गायकवाड आदी उपस्थित होते.

Exit mobile version