Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काकाच्या मृत्यूची वाट बघतो; जितेंद्र आव्हाडाची अजित पवारांवर जोरदार टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शेवटची निवडणूक आहे, असे सांगून तुम्हाला भावनिकही केलं जाईल. मात्र कधी शेवटची निवडणूक होईल काय माहिती? असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला व बारामतीकरांना साद घालत मी जो उमेदवार देईल त्याला निवडून द्या, असे विधान केले. अजित पवारांच्या या विधानावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड संतापले. त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली.

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा जोरदार समाचार घेतला. आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल, असा घणाघात केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करण कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय . शरद पवार अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही.

शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत. तुमचा एक निर्णय दाखवा. अजित पवार यांनी त्यांचं दिल्लीतल एक भाषण दाखवावं. साहेबांची खरी चूक आहे साहेबांनी अजित पवारला कधी ओळखलं नाही. राज्य उत्पादन मागितलं ते दिल फक्त पैसे खाण्यासाठी. शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे. अजित पवार हा महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Exit mobile version