Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अडावद येथील कांदा उत्पादक शेतक-यांना अनुदानाची प्रतिक्षा

chopada 3

 

 

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथील 211 कांदा उत्पादक शेतक-यांना कांदा अनुदान मिळालेले नाही. शासनाकडे गेल्या चार माहिन्यापासून हे अनुदान अडकलेले आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अड़ावद येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा ज्या व्यापाऱ्याला विक्री केला होता. तो व्यापारी शेतकऱ्यांना चकमा देऊन पोबारा झाला आहे. शेतकऱ्यांचे त्या व्यापाऱ्यांकडे अडकलेले पैसे बुडीत झाले आणि कांदा उत्पादकाना शासानाकडून प्रति किंटल 200 रुपये अनुदान जाहीर झाले होते मात्र हे अनुदान मिळण्यासाठी कांदयाची विक्री, सौदा आणि हिशोब पावती अश्या पावत्या अनुदान प्राप्तीसाठी आवश्यक आहे. परंतु व्यापारीच फरार झाल्याने ह्या पावत्या कांदा उत्पादकाकडे नसल्याने शासनाचे अनुदान रखडले होते. मागील चार महिन्यापासून 211 कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. शेतकऱ्यांची व्यथा पाहून चोपडा पिपल्स बँकचे चेअरमन चंद्रहास गुजराथी व कृउबा समितीचे सभापती जगन्नाथ पाटील यांनी दि. 18 रोजी महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी चौण्डी ता. जामखेड जि. अहमदनगर येथे भेट घेतली. याभेटी प्रसंगी चंद्रहास गुजराथी, आणि जगन्नाथ पाटील यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि मंत्री शिंदे यांनी विनंती करून सांगितले की, त्यांचे कांद्याचे पैसेही बुडाले आहे आणि अनुदान ही मिळत नाही. या शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय राहिला नाही. ही संपूर्ण व्यथा ऐकून पणन मंत्री राम शिंदे यांनी शब्द दिला की, मी शेतकऱ्यांचा पाठीशी आहे, लवकरच अनुदान प्राप्त करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, आमदार हरीभाऊ जावळे यांनीही प्रयत्न केला होता.

 

Exit mobile version