Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सियाचीनमध्ये हिमस्खलन; बर्फाखाली दबून सहा जवान शहीद, दोन बेपत्ता

siachen scenes

 

सियाचीन (वृत्तसंस्था) जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी अशी ओळख असलेल्या सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन त्याखाली गस्तीपथकातील ४ जवान शहीद झाले असून दोन पोर्टर ठार झाले, तर गस्तीपथकातील ८ जवान दबले गेले आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

 

उत्तर सियाचिनमध्ये जवानांची एक आठ सदस्यीय तुकडी बर्फाच्या वादळाच्या तडाख्यात सापडली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बर्फाचं वादळ आलं. या वादळात हे जवान अडकले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी जवानांची ही तुकडी गस्तीवर होती. सियाचिन ग्लेशियर काराकोरम पर्वत रांग 20 हजार फुट उंचीवर आहे. हे जगातील सर्वात उंच क्षेत्र आहे जिथे जवानांचा पहारा असतो. थंडीच्या मोसमात जवानांना नेहमीच बर्फांच्या वादळांचा सामना करावा लागतो. वादळांमुळे या ठिकाणी नेहमी हिमस्खलन होते.आज गस्तीपथकातील आठ जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्यानंतर माहिती मिळताच तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र सहा जवान शहीद झाले तर दोन जवान अजून बेपत्ता आहेत. या दोन जवानांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

Exit mobile version