Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॅप्रोस्कोपिक सर्जरी अभियानाचा लाभ घ्या – डॉ.केतकी पाटील

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात लॅप्रोस्कोपीक सर्जरी अभियानाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आता लॅप्रोस्कोपीक अर्थात दुर्बिणीद्वारे केल्या जात असून त्याचे अनेक फायदे रुग्णांना मिळतात. त्या पार्श्वभूमीवर डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात लॅप्रोस्कोपी सर्जरी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी केले आहे.

 

लॅप्रोस्कोपीक सर्जरीमध्ये लहान चिर देवून शस्त्रक्रिया होते. तसेच रुग्णास वेदना कमी होतात, सर्जरीनंतर रिकव्हर होण्यासाठी कमी वेळ लागतो, रुग्णालयातील मुक्‍कामही कमी असतो, शस्त्रक्रियेचे कमी व्रण असतात तसेच रक्‍तस्त्राव देखील कमी होते, यासह अनेक फायदे लॅप्रोस्कोपीक सर्जरीचे आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आग्रहास्तव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात लॅप्रोस्कोपीक सर्जरी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अपेंडीसायटिस, पित्‍ताशय खडे (गॉल ब्लॅडर), पोटाचे विकार, अंडाशयातील गाठी (ओवेरियन सिस्ट), गर्भपिशवीचे आजारावर दुर्बिणीद्वारे सर्जरी केली जाते. सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे, येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच आयुषमान भारत योजना लागू आहे.

 

तसेच लॅप्रोस्कोपी सर्जरी अभियान मर्यादित कालावधीसाठी असून नावनोंदणीसाठी लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉ.वैभव फरके, ८९९९१९७६९८, सर्जरी निवासी डॉ.स्मृती ९६०४०३०७६१, स्त्रीरोग निवासी डॉ.निलीजा यांच्याशी ९१६७७८५९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय आपले जुने रिपोर्ट व्हॉट्स अप वर टाकून डॉक्टरांद्वारे सल्‍ला देखील घेतला जातो, त्याकरीता आशिष भिरुड यांच्याशी ९३७३३५०००९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Exit mobile version