Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात उद्या शरद युवा संवाद कार्यक्रम

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे संकल्पनेतून युवक जोडो अभियानास प्रारंभ झाला असून पाचोरा येथे उद्या शरद युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. ८ रोजी मंगळवारी सकाळी १० वाजता पाचोरा येथे या अभियानाची सुरुवात होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, युवकांचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पाचोरा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन गडकरी, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, भडगाव येथील तालुका अध्यक्ष राहुल पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, शहराध्यक्ष भोसले, पाचोरा येथील शहर युवक अध्यक्ष अभिजित पवार, सुदर्शन महाजन उपस्थित राहणार आहेत.

पाचोरा येथील कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाब डेअरी येथील कार्यालयात सकाळ दहा वाजता तर भडगाव येथील कार्यक्रम येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयात दुपारी दोन वाजता होणार आहे. पाचोरा भडगाव तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पाचोरा व भडगाव येथील युवक अध्यक्षांनी केले आहे.

 

Exit mobile version