Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच वाहनाची मागणी वाढेल – मोदी

pm narendra modi pti 650x400 41483102080

नवी दिल्ली प्रतिनिधी । गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे माहिती मिळल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातमध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आल्याने टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपले उत्पादन कमी केल्याने दोन ते तीन महिन्यांत जवळपास 15 हजार जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मात्र लवकरच मागणी वाढविण्यासाठी योजना आखली जाईल, असे मोदींनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ऑटो इंडस्ट्रीनं प्रसिद्ध केलेल्या ‘SIAM’च्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. तसेच या अहवालात गाड्यांची एकूण विक्री, प्रवासी गाड्या, दुचाकींची विक्री यांचाही समावेश करण्यात आला आहे. 2018 मध्ये या गाड्यांची विक्री 22 लाख 45 हजार 224 एवढी झाली होती. मोदींनी सांगितले की, अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE)वर आधारित ऑटोमोबाईलसह विद्युत वाहन (EV) आणि कम्पोनेंट्स उत्पादक कंपन्यानी घाबरायचे कारण नाही. कारण पुढील महिन्यात सण असल्याने मागणी वाढविण्यासाठी लवकरच योजना आखणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचे अध्यक्ष राजन वाधेरा यांनी पंतप्रधानाच्या निर्णयाचे स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे.

Exit mobile version