Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंडळाधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार द्या; भाजपाची मागणी

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सात मंडळाधिकारी यांना प्रतिज्ञा पत्रावर स्वाक्षरी करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन भाजपा बेटी बचाव बेटी पढाव चे जिल्हा समन्वयक सारिका चव्हाण यांनी रावेर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार रावेर तालुक्यातील सात सर्कल यापुर्वी देण्यात आले होते. ते अधिकार काढण्यात आले होते. शासनाने मंडळाधिकारी यांना प्रतिज्ञापत्रावर सही करण्याचे अधिकार देण्यात यावा. यामुळे रावेर तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना होत असलेला त्रास कमी होऊन सर्व सामान्य जनतेचा पैसा, वेळ व मनस्ताप कमी होईल. संजय गांधी निराधार योजना, शेतकरी बांधव तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रतीज्ञापत्र, जातीचे दाखले, व अनेक इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. हे काम आधी सेतुच्या माध्यमातून होत होते, पण काही दिवसांपासून वकीलांन मार्फत या विषयांसाठी नोटरी करावी लागत आहे. त्याचा खर्च व वेळ हा सामान्य नागरिकांना परवडत नाही. जनसामान्यांच्या अडचणीत वाढ होते. तरी तहसीलदार साहेब आपण या सामन्यात जनतेचे पालक आहात आपण हा अधिकार जर तालुक्यातील सरकल साहेबांना दिला तर जनसामान्यांच्या अडचणीत दुर होतील असे जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे, व बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेश धनके, जिल्हाध्यक्ष महीला मोर्चा रंजना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस हरीलाल कोळी, जिल्हा चिटणीस राजन लासुरकर, रावेर तालुका अध्यक्ष महेश चौधरी, सुनिल पाटील, पंचायत समिती सभापती कविता कोळी, जिल्हा चिटणीस रेखा बोंडे, यावल तालुका महिला आघाडी अध्यक्षा जयश्री चौधरी, वासुदेव नरवाडे, दिपाली झोपे, नितीन पाटील, किसान मोर्चा रावेर तालुका अध्यक्ष राहुल महाजन, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version