Author: news desk

धरणगाव सामाजिक

धरणगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) येथे थोर समाजसुधारक स्वच्छता अभियानाचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची १४३ वी जयंती मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. तसेच नगरपालिकेतर्फे प्रशासकीय इमारत सभागृहातील कार्यक्रमात प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांनी संत गाडगे महाराज याचा प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी भाजपा गटनेते कैलास माळी व माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी गाडगेबाबा यांचा स्वच्छता संदेश घरोघरी पोहचवा असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, विजय महाजन, नूतन विकास सोसायटी नवनिर्वाचित चेअरमन धीरेंद्र पुरभे, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, विलास महाजन, नंदू पाटिल, परिट समाजचे प्रांत सदस्य छोटू जाधव, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विनोद रोकडे, शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र […]

चाळीसगाव राजकीय

चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

चाळीसगाव (प्रतिनिधी) मतदार संघातील गावांमध्ये मुलभूत सुविधेअंतर्गत विकासकामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. उन्मेशदादा पाटील यांनी ग्रामविकास मंत्री ना. सौ. पंकजा मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. आ. उन्मेश पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत मंत्र्यांनी २५१५ मुलभूत सुविधा योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निधी चाळीसगाव तालुक्याला मिळाला आहे.   या निधीतून पुढील प्रमाणे कामे करण्यात येणार आहेत १ – भामरे येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे (७ लक्ष) व रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष) २ – टेकवाडे येथे रस्ता सुधारणा करणे (५ लक्ष) ३ – राजदेहरे […]

जळगाव मनोरंजन

पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन संदीप सावंत यांचे हस्ते तर समारोपाला दीपल लांजेकर!

जळगाव (प्रतिनिधी) पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, येत्या १ ते ४ मार्च दरम्यान माया देवी नगर येथील रोटरी हॉल येथे हा महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन १ मार्च रोजी सकाळी १० वाजता आ. स्मिता ताई वाघ आणि ‘श्वास’ चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचे हस्ते योजण्यात आले असून, समारोप ४ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे हस्ते संपन्न होणार आहे. या प्रसंगी फर्जंद चित्रपटाचे चे दिग्दर्शक दीपक लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पर्यटन वा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहयोगाने अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या सहकार्याने समर्पण संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन […]

धरणगाव सामाजिक

धीरेंद्र पुरभे यांचा परिट समाजातर्फे सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विकास सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे शहर संघटक धीरेंद्र पुरभे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा परीट समाजातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शिरीष बयस, नूतन सोसायटी संचालक निलेश चौधरी, राजेंद्र महाजन, भगवान महाजन, शैलेंद्र चंदेल व सर्व सचालक उपस्थित होते.

राजकीय राष्ट्रीय

आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या – मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘काही गोष्टी देशात होऊच शकत नाहीत असं काही वर्षांपूर्वी म्हटलं जायचं. मात्र, देशातील जनतेच्या पाठिंब्याने व सहकार्याने आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षांतील आर्थिक सुधारणांनी देशाचं चित्र बदलून टाकलंय,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. राजधानीत आयोजित ‘ईटी ग्लोबल बिझनेस समीट’ मध्ये देशानं गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ‘२०१४ साली अनेक पातळ्यांवर व निकषांवर आपली अर्थव्यवस्था गर्तेत गेल्याचं चित्र होतं. मग ती महागाई असो, चालू खात्यातील तूट किंवा वित्तीय तूट. आर्थिक सुधारणा अशक्य आहेत असा एक समज झाला होता. […]

क्राईम राज्य

धक्कादायक…मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच नकली क्राईम ब्रांच

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात गुन्हेगारीला अक्षरश: ऊत आला आहे. गुन्हेगारांनी वेगवेगळ्या युक्त्या शोधून पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. आता तर एका भामट्याने चक्क नकली क्राईम ब्रॅन्च म्हणजेच ‘गुन्हे अन्वेषण शाखा’ सुरु केली होती, ती ही भाड्याच्या घरात. एवढेच नाही तर डायरेक्टर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा त्याने बोर्डही लावला होता. तो शहरात खुलेआम फिरत होता. पोलिसांनी नागपूरच्या समर्थनगर भागात एका भाड्याच्या घरात छापा टाकून नकली क्राईम ब्रॅन्चचा भंडाफोड केला. आरोपी नरेश पालरपवार हा ‘क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ नावाने ही नकली क्राईम ब्रॅन्च चालवत होता. पोलिसांनी आरोपी पालरपवार याला अटक केली आहे. तसेच त्याच्या कार्यालयातून काही दस्ताऐवजही जप्त केले आहेत. अशिक्षितांची […]

अमळनेर सामाजिक

संत गाडगेबाबांचे कार्य बहुजन समाजाला प्रेरणादायी : दिलीप सोनवणे (व्हिडीओ)

अमळनेर (प्रतिनिधी) साधी राहणी ,आणि उच्च विचारसरणीचे संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. संत गाडगे महाराजांना सामाजिक न्याय,आणि सुधारणा व स्वच्छता यामध्ये जास्त रुची होती. त्यांचे कार्य संपूर्ण बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले. ते अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय व डेबुजी झिंगराजी जानोरकर ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून शासकीय प्रतिमा वाटप प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून  बोलत होते.   व्यासपीठावर साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्यां उपाध्यक्षा प्राध्यापक डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ ,विश्वस्त बापू नगावकर ,परीट समाजाचे अध्यक्ष […]

क्राईम जळगाव

वाळू माफियांकडून पोलिसांवर दगडफेक;तीन कर्मचारी जखमी

  जळगाव (प्रतिनिधी) अवैध वाळु तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या आरसीपी पथकातील तीन कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना खेडी नदीपात्रात शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी अज्ञात २० ते २२ लोकांविरुद्ध तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, आरसीपीच्या पथकातील पोलिस नाईक प्रकाश मन्साराम वाघ यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी रात्री २२ पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक वाळु तस्करांवर कारवाईसाठी मुख्यालयातून निघाले होते. रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांना खेडी गावाजवळ वाळु वाहुन नेणारे एक ट्रॅक्टर मिळुन आले. ट्रॅक्टर जप्तीची कारवाई पुर्ण करुन हे ट्रॅक्टर तालुका पोलिस ठाण्यात आणत होते. त्याचवेळी घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर अंधार लपून बसलेल्या सुमारे २० ते २२ […]

अमळनेर शिक्षण सामाजिक

स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे संत गाडगेबाबा यांचे कार्य समाजाला दिशा देणारे : अनिल महाजन

अमळनेर (प्रतिनिधी) संत गाडगे महाराजांविषयी बहुजन समाजात कमालीचा आदर भाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे कार्य मोलाचे व समाजाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. ते संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सर्वप्रथम संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले प्रतिमेला माल्यार्पण ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी केले. व्यासपीठावर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के , शिक्षक आय आर महाजन, एस.के.महाजन,एच.ओ.माळी, लिपीक एन.जी.देशमुख होते. यावेळी श्री.महाजन पुढे म्हाणाले की, संत गाडगे महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र केलेली स्वच्छतेची जनजागृती त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देणारे एकमेव […]

एरंडोल क्राईम

एरंडोलला पेट्रोलपंपावर बंदुकीच्या धाकाने लुटमार

एरंडोल (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील एका पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात अधिक असे की, धरणगाव येथील बाबूलाल शहा यांचा एरंडोलपासून साधारण ५ कि.मी अंतरावर नवीन धारागीर गावाजवळ हाय-वे वर एम.जी शहा नावाने पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोलपंपावर रवींद्र पाटील व निलेश पाटील हे दोन कर्मचारी नेहमी प्रमाणे कामावर होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आले. त्यानंतर त्यांनी दोघं कर्मचारींना बंदुकीचा धाक दाखवून साधारण ४७ हजाराची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल […]