Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव

जळगाव प्रतिनिधी | रावेर तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करुन वाहतूक करतांना जप्त केलेल्या वाहन मालकांनी दंडात्मक कार्यवाहीच्या आदेशातील रक्कम शासन जमा केल्यामुळे ही वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

रावेर तालुक्यात वाळू चोरी विरोधी पथकांनी नदीपात्रातून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करुन वाहतूक करीत असताना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. मात्र या वाहनाच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीच्या आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नाही. अशा प्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसूल करण्यासाठी गुरुवार, दि.१६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, रावेर येथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव होईल.

इच्छूक व्यक्ती, संस्थांनी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी, शर्ती, लिलावातील वाहने, लिलावात हातची किंमत आदी.बाबत कार्यालयीन वेळेत रावेरचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा असे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version