Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावच्या अतुल पाटीलने पटकावली वेले केशरीची गदा

80253a0e 3832 4e45 b611 072a6e8e6b30

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील नामांकित पहेलवान व शिवाजी नगर पुणे, रेल्वे स्टेशनचे तिकीट निरीक्षक पहेलवान अतुल पाटील यांनी नुकताच पुणे जिल्ह्यातील वेले येथे झालेल्या वेले केशरी या मानाच्या कुस्ती स्पर्धेत विजय मिळवला आहे. त्यांनी कोल्हापूर येथील पहेलवान समाधान पाटील यांना चिटपट करून,मानाची चांदीची गदा व रोख रक्कम,51,000 असे बक्षीस मिळविले.

 

 

या अतुल पाटील यांच्या यशाने जळगाव जिल्ह्यातील पहेलवान मंडळीमध्ये आंनद साजरा होत आहे. अतुल पाटील यांचे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नारायण भाऊ अग्रवाल, जळगाव जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राजीव देशमुख, रघुवीर व्यायाम शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य सुनील देशमुख, माजी आमदार ईश्वर जाधव, सरपंच संघटनेचे अध्यक्ष किसनराव जोर्वेकर, डॉ सुनील राजपूत, डॉ बाविस्कर, आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष आण्णासाहेब कोळी, दिपक पाटील, रांजणगाव पंचायत समिती सदस्य जिभाऊ पाटील, पत्रकार आर.डी.चौधरी, तसेच चाळीसगाव तालुक्यातील वाघडू, वाकडी, रांजणगाव सायगाव येथील पहेलवान मंडळी ने अभिनंदन केले आहे.

Exit mobile version