बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न; दिव्यांग बांधवांचा आंदोलनाचा इशारा

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामसेवकांकडून खोटे अपंग प्रमाणपत्र दडपण्याचा प्रयत्न केल्यास अपंग बांधवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेर तालुक्यातील ग्रामसेवकांकडून खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रमाणपत्राची पडताळणी जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्री मारुती पोटे व त्यांचे सदस्य सलीम शेख यांच्यामार्फत करण्याची मागणी अपंग बांधवांनी केली आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे सेटलमेंट झाल्यास तसेच ग्रामसेवकांच्या पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास सर्व दिव्यांग बांधवांतर्फे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भाजप तालुकाध्यक्ष दिव्यांगा आघाडी रजनीकांत शामराव बारी, सचिव संदीप पाटील, दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष संजय बुवा, उपाध्यक्ष घनश्याम हरणकर, तालुका अध्यक्ष ईश्वर महाजन, उपाध्यक्ष महेश महाजन, संजय माळी, मूकबधिर अध्यक्ष निलेश पाटील, संदीप पाटील यांच्यासह मोठ्या संखेने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Protected Content