Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्लेडने रोकड लांबविण्याच्या प्रयत्न; दोन महिलांना रंगेहात पकडले

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील सेवानिवृत्त व्यक्ती बँकेतून पैसे काढून बाजारात खरेदी करत असतांना पिशवीतील रक्कम चोरून नेतांना दोन महिलांना रंगेहात पकडले. दोघांना पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, धर्मराज लोटन पाटील (वय-६८) रा. शनी मंदीर चौक, पारोळा हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. १६ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडीया येथून २१ हजार रूपये काढून बाजारात खरेदी करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून दोन महिलांनी त्यांच्या पिशवीला ब्लेडने कापून २१ हजाराची रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार धर्मराज पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पैसे संभाळत दोघांना पकडले. त्यांची चौकशी केली असता अंजली गजराज सिासोदिया (वय-२०) आणि रचना उमेश सिसोदिया (वय-३०) दोन्ही रा. कडिया ता. नरसिंगगड जि. राजगड (मध्यप्रदेश) यांना असे सांगितले. दोघांना पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील  तपास पोकॉ. संदीप सातपुते करीत आहे.

Exit mobile version