Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बनावट चावीने महिलेचे बंद घर उघडून चोरी करण्याचा प्रयत्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भवानी पेठ परिसरात महिलेचे बंद घर बनावट चावीने उघडून चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीला आला आहे. याप्रकरणी सोमवार २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मारिया जोझर बदामी (वय-२८, रा. भवानी पेठ, जळगाव ) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना संशयित आरोपी अमजद इकबाल खान (वय-२८ रा.बिलाल चौक तंबापूरा) याने बनावट चावीच्या मदतीने घराचे लॉक उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात महिलेने सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अमजद इकबाल खान (रा. बिलाल चौक, तांबापुरा) यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रवींद्र परदेशी हे करीत आहे.

Exit mobile version