Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनयभंग केल्याचा संतापातून अल्पवयीन मुलीची विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील एका गावात तरूणांनी छेड काढल्याने तसेच विनयभंग केल्याचा संताप झाल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने फवारणीचे औषध प्राशन करत स्वत:च्या हातावर ब्लेड मारून घेतल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला उपचारासाठी पहुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार असे की, ८ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या काकाच्या घरी जात होती. यादरम्यान दुचाकीवरून तरुण आला त्याने अल्पवयीन मुलीची छेड काढली तसेच खांद्यावरील अोढुन काही अंतर पुढे जाऊन   ओढणी जमिनीवर फेकून दिले. तरुणाने छेड काढल्याच्या याप्रकाराचा अल्पवयीन मुलीला मनस्ताप झाला. त्यातून तिने दुसऱ्या दिवशी आईवडील शेतात कामाला गेले असताना पिकांचे फवारणीचे औषध  प्राशन केले व  स्वत च्या हातावर ब्लेड मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या गल्लीतील महिलेला लक्षात आल्याने तिने मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानुसार कुटूंबियांनी मुलीला खासगी वाहनातून प्रवास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी  जखमी तरुणीच्या जबाबावरून सद्दाम अब्दुल पिंजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे हे करीत आहेत.

Exit mobile version