Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूरचे मंडळ अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न !

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । फैजपूर येथील मंडळ अधिकारी एम.एच.तडवी हे बुधवारी रात्री तालुक्यातील सावखेडा येथे चारचाकी वाहनाने जात असताना विरावली गावाजवळ एका डंपरने त्यांच्या वाहनाला धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात फैजपूर तालुका यावल येथील मंडळ अधिकारी डॉ.एम.एच.तडवी  यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी बुधवारी रात्री मुलगा बिलाल तडवीसह चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.१९ सीझेड ने तालुक्यातील सावखेडासिम आपल्या गावी जात असताना रात्री ८:४५ वाजेच्या सुमारास विरावली गावाजवळ दहीगाव कडून भरधाव वेगात येत असलेला डंपरने, मला व माझ्या मुलास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आमच्या चारचाकी वाहनास जबर धडक दिली.  बचावासाठी  मी वाहन रस्त्याच्या कडेस खाली उतरवले.  घटनेनंतर डंपर चालक सुसाट वेगात निघून गेला. या घटनेत तडवी यांच्या चारचाकी वाहनाचे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. फिर्यादी मध्ये मंडळ अधिकारी तडवी यांनी आपणास जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच धडक दिली असल्याचे म्हणत फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष निलेश ऊर्फ पिंटू राणे यांच्या वर संशय व्यक्त केला आहे.  येथील पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अशित कांबळे पुढील तपास करत आहेत.

 

Exit mobile version