Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसोली येथे अत्तरदे यांच्या प्रचारार्थ रॅली (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 15 at 7.48.16 PM

शिरसोली, प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास घेवून उमेदवारी दाखल केलेले भाजपाचे अधिकृत बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांचा शिरसोली गावात प्रचार दौरा आज १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी  ६.०० वा. मोठ्या उत्साहाने पार पडला.

शिरसोली येथे चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचार रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते गावकऱ्यांकडून स्व-खर्चाने काढण्यात आलेली भव्य ट्रॅक्टर रॅली ढोल तश्याच्या गजरात काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व स्थानिक जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी माजी कृ.उ.बा.स. सभापति लकी आण्णा उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, भाजपा जळगाव तालुका अध्यक्ष संजय भोळे, शिरसोली-चिंचोरी गटातील शक्ति प्रमुख प्रकाश बारी, नितिन नागपुरे, गिरीश बर्हाटे, चंद्रकांत काळे, अनिल पाटील, बूथ प्रमुख कैलास भुते, जितेंद्र बारी, राजू अस्वार, हितेंद्र आशापुरे, ज्ञांनेश्वर नाईक, कृष्णा बारी, शरद नागपुरे, रविंद्र तडे, समाधान गिरणारे, उमाकांत महाजन, भूषण काटोळे, पवन पवार, भूषण धनगर, भागवत पाटील, गोविंदा तांदळे, नाना पाटील, पंकज तायडे, संजय सोनवणे, रोहित पवार तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version