Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात तरूणावर प्राणघातक चाकू हल्ला

भुसावळ प्रतिनिधी । येथील कुंदन वराडे या तरूणावर दोघांनी पुर्व वैमनस्यातून चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे घटना आज रात्री घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील नाहाटा चौफुली जवळ कुंदन विजय वराडे यांच्यावर रात्री १०:०० वाजेच्या दरम्यान प्राणघातक चाकू हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नाहाटा चौफुली जवळ संशयित आरोपी अमोल राणे ( राहणार, श्रीराम नगर) असून दुसरा संशयित आरोपी विशाल घेघट (राहणार वाल्मिक नगर) आहेत. त्यांनी कुंदन विजय वराडे याला त्याचे घरून बोलावून नाहाटा चौफुली जवळ बोलविले आणी काही कळण्याचे आतच त्याच्या गळ्यावर चा़कूने गळ्यावर दोन केले. दरम्यान, बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी त्वरित जखमींवर उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये रवाना केले असून उपचार सुरू असल्याची माहिती दिली. बाजारपेठ पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Exit mobile version