Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपचे उमेदवार पराग शाह यांच्या वाहनावर हल्ला

546778 parag shah 020817

मुंबई (वृत्तसंस्था) घाटकोपर पूर्वमधील भाजपचे उमेदवार पराग शाह यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, तिकीट न मिळाल्यामुळे विद्यामान आमदार प्रकाश मेहतांच्या कार्यकर्त्यांनी हा केल्याचा आरोप होत आहे. थोडक्यात घाटकोपरमध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.

 

भाजपने आज सकाळी 7 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत घाटकोपर पूर्वमध्ये विद्यामान आमदार प्रकाश मेहतांना डावलून पराग शाह यांना तिकीट दिले. दरम्यान या तिकीट वाटपावरून मेहतांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी पराग शाह यांच्या घाटकोपर येथील घरासमोर गोंधळ घालण्यास आज सकाळी सुरुवात केली. या गोंधळादरम्यान कार्यकर्त्यांनी शाहांच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान प्रकाश मेहता यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version