Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कारवर रात्री उशीरा हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी शिवसैनिकांवर त्यांनी आरोप केला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. मोहित कंबोज हे उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते तिथून परतताना हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहित कंबोज जात असताना कलानगर येथील सिग्नलवर थांबले असता मातोश्री बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी कंबोज यांची गाडी ओळखून गाडी गाठली आणि शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेत मोठा अनुचित प्रकार होण्यापासून रोखण्यात आलंय. यावेळी जमलेल्या शिवसैनिक कंबोज यांना शिवीगाळ करत असल्याच देखील दिसून येत आहे. मोहित कंबोज हे रेकी करण्यासाठी या परिसरात आल्याचा आरोप उपस्थित शिवसैनिकांनी केला आहे.

दरम्यान, या हल्ल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निषेध केला आहे. हा सत्तेचा गैरवापर असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी केली आहे.

Exit mobile version